चिपळूण : तरुणीची गळफास घेत आत्महत्या

banner 468x60

शहरातील राहुल गार्डन वडार कॉलनी येथील तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी घडली. याबाबत येथील पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे.

अनुराधा मारुती दानोळे, (17, रा. राहुल गार्डन बिल्डींग नंबर15), असे तरुणीचे नाव आहे.अनुराधा हिने घरी कोणीही नसताना किचन रूम मधील पंख्याच्या हुकाला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

हा प्रकार घरच्यांच्या लक्षात येताच त्यांना धक्का बसला. तात्काळ पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. मात्र अद्याप तिच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी चिपळूण पोलीस अधिक तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *