चिपळूण : ओवेस पेचकर यांनी सहकुटूंब बजावला मतदानाचा हक्क

Screenshot

banner 468x60

देशात लोकसभा निवडणुकांसाठी तिसरा टप्प्याचं मतदान आज होतंय. आज राज्यात 11 तर देशात 93 लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे.

रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये ११ वाजेपर्यंत २१. १९ टक्के मतदान झालं आहे. कोकण प्रादेशिक पक्षाचे संस्थापक ओवेस पेचकर यांनी सहकुटूंब चिपळूणमध्ये मतदानाचा हक्क बजावला आहे.

ओवेस पेचकर यांनी सहकुटूंब बजावला मतदानाचा हक्क

मतदारसंघात सकाळपासूनच मतदानासाठी थोड्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली. मात्र उन्हाचा पारा वाढल्याने मतदान काही प्रमाणात संथ गतीने सुरु असल्याचं दिसत आहे.

तिसऱ्या टप्प्यातील एकूण ११ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे
लातूर – २०.७४ टक्के
सांगली – १६.६१ टक्के
बारामती – १४.६४ टक्के
हातकणंगले – २०.७४ टक्के
कोल्हापूर -२३.७७ टक्के
माढा -१५ .११ टक्के
उस्मानाबाद -१७.०६ टक्के
रायगड -१७.१८ टक्के
रत्नागिरी -सिंधुदूर्ग-२१.१९ टक्के
सातारा -१८.९४ टक्के
सोलापूर -१५.६९ टक्के

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *