चिपळूण : गाडीच्या व्यवहारात,8 लाखांची फसवणूक

banner 468x60

चिपळूणयेथील युनियन बँक ऑफ इंडियाच्या शाखेतून गाडीसाठी आठ लाख रुपये देऊनही गाडी न दिल्यामुळे सांगली जिल्ह्यातील तिघांनी खेड तालुक्यातील धामणदिवी येथील एकाला गंडा घातला.

याप्रकरणी तिघांवरही फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.संतोष किसन माने (रा. विसापूर), विजय लक्ष्मण माने व आरिफ अल्ताफ फकीर (दोघेही रा. कवठेएकंद, तासगाव, सांगली) अशी गुन्हा दाखल झालेल्या तिघांची नावे आहेत.

या घटनेची तक्रार ट्रान्सपोर्ट व्यावसायिक जियान शब्बीर काझी (वय २६, रा. धामणदिवी, खेड) यांनी दिली. काझी यांनी २४ ऑगस्ट २०२३ रोजी या तिघांकडून डंपर (एमएच १०, सीआर ९७७२) खरेदी करण्यासाठी चिपळुणातील युनियन बँकेतून आठ लाख रुपये दिले होते;

मात्र त्यानंतर त्यांनी ठरल्याप्रमाणे गाडी न देता काझी यांची फसवणूक केली. त्यानुसार तिघांवरही गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी चिपळूण पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *