युनिटेक कॉम्प्युटर एज्युकेशन सेंटरचा चिपळूण शहरात मोठ्या उत्साहात शुभारंभ

banner 468x60

MS-CIT सह विविध कोर्सेस करण्याची विद्यार्थ्यांना संधी

गेल्या दशकाहून अधिक काळ गुहागर तालुक्यातील शृंगारतळी या मध्यवर्ती ठिकाणी MKCL मान्यता प्राप्त युनिटेक कॉम्प्युटर एज्युकेशन सेंटर

सोबतच नर्सिंग, फॅशन डिझायनिंग व विविध व्यवसायभिमुख दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारी नामांकित संस्था आता चिपळूणकरांच्या शैक्षणिक सेवेसाठी चिपळूण शहरातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रासमोर मध्यवर्ती ठिकाणी रुजू झाली आहे.

संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक प्रा.जहूर बोट हे स्वतः विज्ञान व तंत्रज्ञान विषयातील उच्च विद्याविभूषित असून त्यांचे थोरले बंधू संस्थेचे संस्थापक श्री शब्बीर बोट यांची दूरदृष्टी व मार्गदर्शन या बळावर संस्थेने यशस्वी वाटचाल केली आहे.
चिपळूण येथील एम.के.सी.एल.मान्यताप्राप्त युनिटेक कॉम्प्युटर एज्युकेशन सेंटरच्या नूतन शाखेचे उद्घाटन प्रतिष्ठित सामाजिक कार्यकर्ते श्री गुलाम भाई तांडेल यांच्या शुभहस्ते अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना संस्थेचे शुभचिंतक व एस आर दळवी फाउंडेशनचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष, विज्ञान मंडळाचे संचालक श्री सुदेश कदम यांनी प्रा.जहूर बोट यांच्या शैक्षणिक कामगिरी व कार्याची माहिती दिली. काही वर्षांपूर्वी अविकसित व शैक्षणिक सुविधांपासून वंचित असलेल्या गुहागर तालुक्यात युनिटेक कॉम्प्युटर एज्युकेशन सेंटरच्या माध्यमातून तालुक्यातील असंख्य विद्यार्थ्यांना व्यवसायभिमुख शिक्षणाच्या माध्यमातून व्यवसायाच्या व रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यासोबतच त्यांचे सामाजिक क्षेत्रातील कार्य लक्षणीय असून तालुका विज्ञान शिक्षक मंडळाला गेली अनेक वर्षे ते करीत असलेले सहकार्य कौतुकास्पद आहे.


तसेच डी.बी.जे.कॉलेजचे जीवशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ. जी.बी.राजे यांनी आमचे चिपळूणकर अत्यंत चोखंदळ असून आपल्या संस्थेच्या वतीने दिल्या जाणाऱ्या दर्जेदार व गुणवत्ता पूर्ण शैक्षणिक सुविधांना भरभरून प्रतिसाद देतील असा विश्वास आपल्या मनोगतातून व्यक्त केला.
या उद्घाटन सोहळ्यासाठी श्री राज अहमद देसाई शिक्षण विस्तार अधिकारी पंचायत समिती चिपळूण, डी.बी.जे. कॉलेजचे प्रा. श्री बाबर, प्राध्यापिका लीला बिरादार, रजिस्ट्रार श्री अनिल कलकुटकी , युनायटेड हायस्कूलचे उप मुख्याध्यापक श्री बनसोडे, गद्रे कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य श्री शेंडे, दिशांतर संस्थेच्या व्यवस्थापिका सौ सीमा यादव, बेहेरे कॉलेज लवेलचे प्राचार्य श्री कलेकर, लाईफ केअर हॉस्पिटल चे मान्यवर, पत्रकार तसेच लेखिका फैरोजा तसबी, गुहागर तालुका विज्ञान मंडळाचे अध्यक्ष श्री घुटुकडे व गणित विज्ञान मंडळाचे बहुसंख्य शिक्षक उपस्थित होते तसेच चिपळूण अर्बन बँकेचे निवृत्त अधिकारी श्री सुधाकर ताठरे, प्रसिद्ध निवेदिता सौ राणी चितळे,सीए जुली ओसवाल,कोशिश फाउंडेशन चिपळूणचे अध्यक्ष मुजाहिद मेयर , सचिव फय्याज सुर्वे, संस्थेचे शुभचिंतक नूर पलनाक व असंख्य संस्थेचे माजी विद्यार्थी, जिल्हाभरातील शिक्षक, प्राध्यापक व शिक्षणप्रेमी यांची उपस्थिती लाभली.
उपस्थितांचे आभार व्यक्त करताना संचालक प्रा.श्री.जहूर बोट यांनी संस्थेच्या माध्यमातून चिपळूण तालुक्यातील विद्यार्थ्यांना आधुनिक शैक्षणिक सुविधा देण्यासाठी संस्थेचे अनुभवी व तज्ञ शिक्षक कटिबद्ध आहेत. तसेच विद्यार्थ्यांना आनंददायी वातावरणात शिक्षण घेता यावे यासाठी सुसज्ज्व सर्व सोयी सुविधांनी युक्त वर्ग खोल्या असून संस्था शैक्षणिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देऊन विद्यार्थ्यांना सक्षम बनविण्यास उत्सुक असल्याचे मत व्यक्त केले.
युनिटेक कॉम्प्युटर एज्युकेशन सेंटरच्या माध्यमातून चिपळूणकरांना अत्याधुनिक शैक्षणिक सुविधा उपलब्ध झाल्याने अनेक शिक्षण प्रेमींनी समाधान व्यक्त केले.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *