चिपळूण पालिका हद्दीतील उक्ताड ते गुहागर नाका दरम्यानच्या रस्त्यावर सीलकोटचे काम करीत ठेकेदाराने सोमवारी दुरूस्ती केली.
त्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी सध्यातरी सुस्थितीत झाला आहे. पालिकेच्या बांधकाम विभागामार्फत अडीच वर्षापूर्वी शहरातील उक्ताड मराठी शाळा ते गुहागर नाका दरम्यानच्या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते. यासाठी लाखो रुपयांचा खर्च करण्यात आला होता.
या कामाचा हमी कालावधी तीन वर्षांचा असतानाच काही महिन्यानंतर रस्त्यावर खड्डे पडण्यास सुरूवात झाली, यासंदर्भात स्थानिक नागरिकांसह वाहनधारकांमधून ओरड सुरू होती. त्याची दखल घेत पालिका प्रशासनाने ठेकेदाराला रस्ता सुस्थितीत करण्याच्या सूचना केल्या होत्या.
त्यानंतर रस्त्यावरचे खड्डे भरले गेले, मात्र पावसाळ्यात पुन्हा ते खड्डे उखडले. या प्रकाराची गंभीर दखल घेत पालिकेच्या बांधकाम विभागाने संबंधित ठेकेदाराला नोटीस बजावत रस्त्याची तातडीने दुरूस्ती करावी, अशा सूचना केल्या होत्या, पावसाळा संपल्यानंतर या परिसरातील खड्डे भरत लवकरच या मार्गावर सोलकोटचा थर दिला जाणार असल्याची ग्वाही ठेकेदाराने दिली होती.
त्यानुसार सोमवारी मनुष्यबळ आणि यंत्रसामुग्रीच्या माध्यमातून या रस्त्यावर सोलकोटचा थर देऊन रस्ता सुस्थितीत केला आहे. यामुळे स्थानिकांसह वाहनधारकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













