चिपळूण : 5 गावात टँकरने पाणी पुरवठा सुरू, जलजीवन मिशनच्या कामाची संथगती

banner 468x60

तालुक्यातील ग्रामीण भागात पाणी टंचाईची झळ पोहोचू लागली आहे. सातत्याने टँकर सुरू करण्याची मागणी झाल्यानंतर तालुक्यातील पाच गावातील धनगरवाड्यात चिपळूण पंचायत समितीमार्फत टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे.

येत्या काही दिवसांत टँकरग्रस्त गावांमध्ये वाढ होणार आहे. एकीकडे जलजीवन मिशनच्या माध्यमातून गावागावात कोट्यवधीच्या पाणीपुरवठा योजनेची कामे सुरू असताना दुसरीकडे मात्र पाणी टंचाईग्रस्त गावांमध्ये वाढ होत आहे.

तालुक्यातील टेरव, कुडप, सावर्डे, कादवड, कोंडमळा या ठिकाणच्या धनगरवाड्यांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे.

परिणामी टंचाईग्रस्त गावांना दिलासा मिळाला आहे. येथील ग्रामस्थांनी चिपळूण पंचायत समिती आणि तहसील कार्यालयाकडे टँकर सुरू करण्यासाठी अर्ज दिला होता.

त्यानुसार तहसीलदार कार्यालयाकडून टँकर अधिग्रहण करून या पाच गावातील धनगरवाड्यांत पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *