चिपळूण शहरात लाल मिरचीमध्ये भेसळ करून विक्री करणाऱ्या परजिल्ह्यातील महिलांवर पालिकेने सोमवारी कारवाई केली.
त्यांच्याकडून भेसळ केलेली ८०० किलो लाल मिरची जप्त करण्यात आली आहे. स्थानिक व्यापाऱ्यांनी याबाबतचे व्हिडिओ तयार करून ते पालिकेच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर पालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाई केली.
या वर्षी लाल मिरचीचे विक्रमी उत्पादन झाले आहे. त्यामुळे मिरची विकण्यासाठी शेतकऱ्यांनी थेट गाव आणि शहर गाठले आहे. चिपळूण शहर आणि उपनगरांमध्ये थेट शेतकऱ्यांकडून मिरची विक्रीची व्यवस्था करण्यात आल्याचे सांगून, सर्वच प्रकारची मिरची केवळ २०० रुपये किलो दराने विकली जात होती,
व्यापाऱ्यापिक्षा कमी दराने लाल मिरची विकली जात असल्याने दिवसाला हजारो रुपयांची उलाढाल लाल मिरचीच्या विक्रीतून होत होती. बाजारभावापेक्षा कमी दरात लाल मिरची उपलब्ध होत असल्याने ग्राहकांकडून रस्त्यावरच्या मिरची खरेदीला उदंड प्रतिसाद मिळत होता.
त्याचा स्थानिक व्यापाऱ्यांनाही फटका बसला होता. मात्र रस्त्यावर विक्री होणाऱ्या या मिरचीमध्ये भेसळ केली जात असल्याचे स्थानिक व्यापाऱ्यांनी पालिकेच्या निदर्शनास आणून दिले.
मिरची लाल भडक दिसावी यासाठी त्याला रंग लावला जात होता, तसेच वजन जास्त भरावे यासाठी त्यावर पाणी मारले जात होते, स्थानिक व्यापाऱ्यांनी याबाबतचे व्हिडिओ तयार करून ते पालिकेच्या निदर्शनास आणून दिले. त्यानंतर पालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाई करून भेसळयुक्त ८०० किलो मिरचीची पोती जप्त केली आहेत.
चिपळूणमध्ये भेसळयुक्त मिरची विकली जात आहे. परजिल्ह्यातील काही महिला अशी मिरची विकून शह्रातील नागरिकांच्या आरोग्याशी खेळत होते. याबाबतच्या तक्रारी आमच्याकडे आल्यानंतर आम्ही ही बाब पालिकेच्या निदर्शनास आणून दिली.
त्यानंतर पालिकेने तत्काळ कारवाई केली. : किशोर रेडीज, अध्यक्ष, व्यापारी संघटना, चिपळूण
अशी होते भेसळ
- मोहरीत धोतऱ्याचे बीज मिसळले जाते.
- जिरे किंवा बडीशेपमध्ये गवताचे बीज मिसळून त्याला कोळशाने रंगवितात.
- लवंग, दालचिनीत मसाल्याच्या पदार्थांचा अर्क काढून घेतात. निःसत्त्व माल बाजारात विकतात, यातील भेसळ पाण्यावर तरंगते.
- लाल तिखटात विटकरीचा भुगा मिसळतात. हे तिखट ग्लासभर पाण्यात टाकल्यास भेसळ खाली जाते. मिरचीचे तिखट पाण्यावर तरंगते.
- हळदीत मेटॅलिक यलो हा अपायकारक रंग मिसळतात.
- हळदीत रंगीत भुसा किंवा खडूची पावडरही मिसळतात.
- काळ्या मिरीमध्ये पपईच्या वाळलेल्या बिया मिसळतात. हे मिश्रण ग्लासभर पाण्यात टाकल्यास काळी मिरी खाली बसतात.
*पपईच्या बिया तरंगतात पपईच्या बियांमुळे अंधत्व येऊ शकते. - शुद्ध हिंग पाण्यात विरघळतो, पाण्याचा रंग पांढरा होतो.
- केशरात मक्याचे तुरे (केसासारखे धागे) वाळवून मिसळतात, तुरे ओढले तर लगेच तुटतात.
- केशर सहज तुटत नाही. ते चिवट असते हा नमुना पाण्यात टाकल्यास केशरातून शेवटपर्यंत रंग पाझरतो. केशरचा वास कायम येतो.
- दालचिनी वर्तुळाकार, बारीक आणि लवचिक असते. भेसळ दालचिनीला अनेक थर आणि ती कठीण असते. यात बाभळीच्या सालीची भेसळ करतात.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*














