चिपळूण : वेहळे बागवाडी येथे जमिनीवरून मारहाण

banner 468x60

वेहेळे बागवाडी येथे वडिलोपार्जीत जागा जमिनीवरून दोन भावांमध्ये व बहिणीमध्ये वाद झाल्याने मारहाण करण्यात आली व जीवे मारण्याची धमकी देण्यात आली.

banner 728x90 banner 728x90

ही घटना गुरुवार दि. ४ जानेवारी रोजी घडली. चिपळूण पोलिसांनी शुक्रवारी याबाबतची माहिती दिली.

वेहेळे बागवाडी येथे दि. ४ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता आरोपी नं. १ मनोहर सखाराम शिर्के व २ सौ. मेघा मनोहर शिर्के (रा. वेहेळे, बागवाडी) यांनी वडिलोपार्जीत सामाईक जागेत

जमीन व झाडाचे हिश्श्याच्या वाटणीवरून संगणमताने फिर्यादी विलास सखाराम शिर्के (६५, रा. वेहेळे बागवाडी) यांना डोक्यावर व फिर्यादी यांची पत्नी यांच्या

पायावर व पाठीवर काठीने मारहाण करून धकलाबुकल करून शिवीगाळी दमदाटी करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली म्हणून अलोरे शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *