चिपळूण : सज्जाद काद्री हद्दपार, दहशत माजवल्याचा आरोप

banner 468x60

सावर्डे व चिपळूण येथे घरफोड्या करण्याचा आरोप असलेला अट्टल चोरटा सज्जाद हसन काद्री (२०, रा. सावर्डे, अडरेकर मोहल्ला) याला उपविभागीय अधिकारी आकाश लिगाडे यांनी एक वर्षासाठी चिपळूण उपविभागातून (चिपळूण व गुहागर तालुका) हद्दपार केल्याचे आदेश बुधवारी (ता. २१) दिले.

सावर्डे पोलिस ठाण्यात काद्रीवर तीन व चिपळूण ठाण्यात एक गुन्हा दाखल आहे. काद्रीविरुद्ध वेळोवळी कारवाई करूनही त्याच्या वर्तनात कोणतीच सुधारणा झालेली दिसून येत नाही. तो समाजविघातक व गुन्हेस्वरूपाची कृत्ये करत असल्याचे स्पष्ट होत आहे.

त्याच्या गैरकृत्यामुळे लोकांच्या जीवाला धोका, भय निर्माण झाले आहे. मालमत्तेची सुरक्षितता राहिलेली नाही. त्याच्या गैरवर्तनामुळे व दहशतीमुळे त्याच्याविरुद्ध उघडपणे तक्रार नोंदवण्यास व साक्ष देण्यास कोणी येत नाही. याशिवाय पोलिस ठाणे सावर्डे येथे सीआरपीसी- १०७ व सीआरपीसी-११० (ई) अन्वये प्रतिबंधात्मक कारवाईचे दोन गुन्हेही दाखल आहेत,

त्यामुळे हो हद्दपारीची कारवाई करण्यात येत असून, एक वर्षाकरिता वरील हद्दीत उपविभागीय दंडाधिकारी चिपळूण अथवा गृहविभाग विशेष महाराष्ट्र शासन यांचे लेखी परवानगीशिवाय प्रवेश करता कामा नये, असे प्रांत लिंगाडे यांनी आदेशात म्हटले आहे.


आरोपी सज्जाद काद्रीबाबत सावर्डे पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक जयवंत गायकवाड यांनी आपला प्रस्ताव उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने यांच्या संमतीने उपविभागीय अधिकारी लिगाडे यांच्याकडे दाखल केला होता. त्याबाबत त्यांनी चिपळूण उपविभागातून बुधवारी हद्दपारीचे आदेश जारी केले आहेत.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *