शहरातील बापट आळी परिसरात राहणाऱ्या एका महाविद्यालयीन विद्यार्थीनींने ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचीं घटना बुधवार सायंकाळी ५ वाजण्याच्या दरम्यान घडली.
चिपळूण पोलीस ठाण्यात मदन संसारे यांनी माहिती दिल्यानुसार त्यांची मुलगी शर्वरी मदन संसारे (२३) ही बुधवारी आपल्या जात पडताळणीच्या कामासाठी रत्नागिरी येथे गेली होती.
मदन संसारे एस्टी बस चालक असल्याने ते कामावर गेले होते तर आई कॅटरर्स व्यावसाय करीत असल्याने सावर्डेत गेली होती. शर्वरी आल्यावर तीची बहिण मंदिरात निघून गेली. यावेळी घरात कोणीच नसल्याचा फायदा घेत शर्वरीने ओढणीने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली.
कॅटरर्सचे साहित्य नेण्यासाठी काही महिला घरी आल्या असता घराचा दरवाजा आतून उघडला जात नसल्याने त्यांनी संसारे यांना कळविले. त्यानंतर घरात प्रवेश केला असता शर्वरीचा मृतदेह लटकताना दिसला.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*














