शहरात अशोका गॅस सर्व्हिसेस एजन्सीकडून गॅस कनेक्शनकरिता रस्ते उकरून, फक्त माती तशीच ओढून ठेवली जात आहे. मात्र रस्ते पूर्वीप्रमाणे डांबरीकरण करण्याची उपाययोजना नाही,
याचा नागरिकांना त्रास होत असल्याने रस्ते पूर्ववत डांबरिकरण करावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अशोक सावर्डेकर यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे केली आहे. अशोका गॅस सर्व्हिसेसकडून पाइपलाइनद्वारे गॅस पुरवठा देण्याकरिता शहरातील व अंतर्गत रस्ते जवळपास
चार फूट खोदले जात आहेत. ते बुजवून पूर्ववत करण्याची जबाबदारी न स्वीकारता फक्त खोदलेल्या ठिकाणी माती ओढली जात आहे. सदरची पूर्तता, रस्ता डांबरीकरण वगैरे बाबी नगर परिषद करेल. त्याची रक्कम आम्ही नगर परिषदेकडे पूर्वीच भरणा केलेली आहे,
असे त्यांच्या प्रतिनिधीकडून सांगण्यात आले. जर सदर रक्कम नगर परिषदेकडे पूर्वीच भरणा झाली असल्यास काम चालू करण्यापूर्वीच त्याचे टेंडर व वर्क ऑर्डर निघणे गरजेचे होते व त्यानंतर रस्ते खोदण्यास परवानगी देणे गरजेचे होते. याबाबी वेळेपूर्वी झालेल्या नाहीत, परिणामी जनतेस त्रास व असुविधा होत आहेत. उकरलेकी माती रस्त्यावर आल्यामुळे दुचाकी, चारचाकी वाहने घरापर्यंत नेणे-आणणे शक्य झाले नाही,
अशी परिस्थिती राहिली, तर पावसाळ्यात मोठ्या समस्या निर्माण होतील, याची भीती आहे. टेंडर काढून रस्ते पूर्वीप्रमाणे त्वरित डांबरीकरण करण्यात यावेत. या बाबी वेळेत झाल्या नाहीत, तर नागरिकांना त्रास होईल, याची दखल घ्यावी, अशी मागणी अशोक सावर्डेकर यांनी केली आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













