चिपळूण, गुहागरमध्ये वादळी वाऱ्याने महावितरणचे 51 लाखांचे नुकसान

Screenshot

banner 468x60

चिपळूण परिसरात झालेल्या वादळी वाऱ्यामुळे महावितरणचे तब्बल ५१ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. पोल व विद्युत तारा तुटून चिपळूण व गुहागर तालुक्यात हे नुकसान झाले असून या वादळी पावसामुळे तब्बल ८५ हजार ५०० वीज ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला.

महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी रात्रंदिवस अथक प्रयत्न करून हा वीजपुरवठा सुरळीत केला आहे. तालुक्याला वळवाच्या पावसाने जोरदार तडाखा दिला. दि. १६ रोजी झालेल्या वादळी पावसाने महावितरणच्या चिपळूण विभागाला मोठा फटका बसला असून लाखोंचे नुकसान झाले आहे.

banner 728x90 banner 728x90

सोसाट्याचा वारा आणि पावसामुळे चिपळूण तालुक्यातील २४ उच्चदाब वाहिनीचे पोल व ५३ लघुदाब वाहिनीचे पोल, तसेच वीजवाहिनीचे ५६ गाळे पडून जमिनदोस्त झाले. यामुळे अनेक भागात रात्री उशिरापर्यंत वीजपुरवठा खंडित होता. त्यामुळे रात्रभर वीज गायब होती.

महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वीजपुरवठा सुरू करण्यासाठी रात्रंदिवस प्रयत्न केले. ज्या ठिकाणी पोल पडले आहेत, तारा तुटल्या आहेत तेथील वीज खंडित करून उर्वरित ठिकाणी वीजपुरवठा सुरू करण्यात आला.

या वादळामुळे चिपळूण शहर तसेच खडपोली, कोळकेवाडी, पेढांबे, कादवड, सावर्डे, कोकरे, परनाकवाडी, दुर्गेवाडी, तिवरे, चिंचघरी, चिवेली, गावठाण, वालोपे, धामणवणे, गणेशवाडी, कळवंडे, कळवंडे वरपेवाडी, शिरळ मोहल्ला, मिरजोळी, जुवाड, कापसाळ तर चिपळूण मार्कडी आदी भागातील वीज पुरवठा खंडित झाला होता.
*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *