चिपळूण : वंदे भारत एक्सप्रेसला चिपळुणात थांबा मिळण्याची मागणी

banner 468x60

मुंबई मडगाव – वंदे भारत एक्सप्रेसला चिपळूण येथे थांबा मिळावा, यासंदर्भातील निवेदन आमदार शेखर निकम यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री

जाहिरातआणिबातम्यादेण्यासाठीसंपर्ककरा 9960151909

banner 728x90

रावसाहेब दानवे यांना दिल्ली येथे नुकतेच निवेदन दिले. यानुसार मुंबई मडगाव – वंदे भारत एक्सप्रेस सुरू केल्याबद्दल आम्ही रेल्वे मंत्री आणि कोकण रेल्वे यांचे अभिनंदन करतो. तसेच याबाबत नमूद करतांना आम्ही खेदाने सांगतो की, वंदे भारत एक्स्प्रेसला रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण स्थानकावर थांबा नाही.

चिपळूण हे सर्वाधिक लोकसंख्येचे शहर आहे, आणि रत्नागिरी जिल्ह्यातील प्रमुख व्यवसाय केंद्र, हायवेनजीक एज्युकेशन हब, उद्योग आणि पर्यटन स्थळांनी जोडलेले आहे. शिवाय रेल्वेत पाणी भरणे आणि इतर सुविधा चिपळूण स्टेशनवर उपलब्ध आहेत. चिपळूण स्थानकाचा महसूल लोकसंख्येनुसार अधिक असेल.

अंतराचे निकष माफ केले जाऊ शकतात किंवा शिथिल केले जाऊ शकतात. जसे की आपण इतर राज्यांमध्ये पाहिले आहे की, वंदे भारत एक्सप्रेस १०० कि.मी. अंतरामध्ये थांबते. तरी या सर्व बाबी विचारात घेऊन मुंबई-मडगाव-वंदे भारत एक्स्प्रेसला चिपळूण रेल्वे स्थानकावर थांबा मिळावा, अशी मागणी आमदार शेखर निकम यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *