चिपळुण : रस्त्यावरच्या पाण्याचा प्रश्न सुटेना!, वाहतूकदारांसह नागरिक हैराण

banner 468x60

मुसळधार पावसामुळे बुधवारी दिवसभर चिपळूण शहर व परिसराला अक्षरशः झोडपले.

🔴 कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा आणि पाहा कोकणातल्या बातम्या 

आपल्या मोबाईलवर

https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi

👉🏻 जाहिरात आणि बातम्या देण्यासाठी संपर्क करा 9960151909

मंगळवारी दुपारनंतर बाजारपेठ परिसरात रस्त्यावर आलेले पुराचे पाणीही निघून गेले. त्यानंतर रात्री उशीरापर्यंत व बुधवारी पहाटेही पाऊस धो धो कोसळत होता.

मात्र दुपारनंतर पावसाचा जोर कमी होताच पुराचा धोका टळला. परंतु त्यानंतरही शहरातील काही मुख्य रस्त्यासह अंतर्गत रस्त्यावरही पावसाचे पाणी दिवसभर साचले होते. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पर्जन्यवृष्टीमुळे मंगळवारी पुन्हा येथे काहीशी पुरपरिस्थिती निर्माण झाली होती.

शहर व आजूबाजूचा परिसर मुसळधार पावसामुळे काही प्रमाणात पाणी आले होते. मात्र ओहोटीमुळे पुराचा धोका टळला. परंतु या पावसामुळे बाजारपेठेच्या मुख्य रस्त्यासह अंतर्गत रस्त्यांवरही पाणी साचल्याने अनेकांना त्याचा फटका बसला. बुधवारी देखील पावसाचा जोर वाढतच राहील्याने काही रस्त्यावर एक ते दोन फूटापर्यंत पाणी होते.

अनंत आईस फॅक्टरी व लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर येथे नेहमीच पाणी साचत आहे. तर मुरादपूर, पेठमाप व गोवळकोट परिसरातील अंतर्गंत रस्त्यांवर पाणी पातळी अधिक होती. मुंबई-गोवा महामार्गावर डीबीजे महाविद्यालयासमोर देखील मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचले होते.

याशिवाय मिरजोळी साखरवाडी येथे रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे देखील अनेकांना फटका बसला. गेल्या दोन दिवसात येथे २६० मिलिमीटर तर आतातपर्यंत एकूण २०७० मिलिमीटर इतका पाऊस झाला आहे. परंतु अद्याप पावसाने २४ तासात २००मिलिमीटर पेक्षा अधिक पाऊस झालेला नाही. तरीही गाळ उपशामुळे वाशिष्ठी व शिवनदीच्या वहन क्षमतेत वाढ झाली असल्याचे स्पष्ट होत आहे.

त्यामुळेच बाजारपेठेत पुराचे पाणी शिरता शिरता थांबले आणि तूर्तास हा धोका टळला. त्यामुळे तीन दिवस मुसळधार पाऊस होऊन देखील चिपळूणकरांना पुराचा सामना करावा लागला नाही. मात्र आता चिपळूणकर वेगळ्याच विषयामुळे अडचणीत आले आहेत. ते म्हणजे रस्त्यावर साचत असलेल्या पाण्यामुळे काहींना त्रास सहन करावा लागत आहे.

वाहनधारकांना त्याचा मोठा फटका बसत आहे. शहरात काही ठिकाणी बांधकामांचे अतिक्रमण झाले असल्याने व काहींनी गाळ उपश्यानंतर त्याचा जागोजागी भराव टाकल्याने नैसर्गिक नाले तुंबू लागले आहेत. परिणामी रस्त्यावर पावसाचे पाणी साचत आहे. नगर परिषद व राष्ट्रीय महामार्ग विभागाने त्यावर वेळीच उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *