गाडीवर पाेलिस दिवा आणि पाटी लावून रुबाबात आलेल्या एका ताेतयाला संगमेश्वर पाेलिसांनी चांगलाच इंगा दाखविला.
🔴 कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा आणि पाहा कोकणातल्या बातम्या
आपल्या मोबाईलवर*
https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi
👉🏻 जाहिरात आणि बातम्या देण्यासाठी संपर्क करा 9960151909
या ताेतया पाेलिसाला रविवारी (९ जुलै) रात्री ९ वाजण्याच्या दरम्यान संगमेश्वर बसस्थानकाजवळ ताब्यात घेतले. सुशांत चंद्रकांत शिंदे (३६, रा. मीरा भाईंदर) असे त्याचे नाव आहे.
संगमेश्वरातील बसस्थानकाजवळ पाेलिस लिहिलेली आणि पाेलिस दिवा असलेली क्वालीस (एमएच ०४, बीक्यू ६७८९) ही गाडी उभी हाेती. या गाडीबाबत संगमेश्वर पाेलिसांना माहिती मिळताच पाेलिस त्याठिकाणी दाखल झाले.
त्यांनी चाैकशी केली असता सुशांत शिंदे पाेलिस नसतानाही बनावट नावाचा वापर करत असल्याचे लक्षात आले. गाडीवर पाेलिस दिवा लावलेला हाेता.
तर चालकाच्या बाजूला पाेलिस अक्षर असलेली पाटी लावलेली आढळली. पाेलिस दिवा आणि पाेलिस नावाचा अनधिकृतपणे ताे फिरत असल्याचे लक्षात येताच त्याला ताब्यात घेण्यात आले.
त्याच्या विराेधात सहायक पाेलिस फाैजदार आर. ए. शेलार यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार भारतीय दंड विधान कलम १७०, १७१ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला देवरुख येथील न्यायदंडाधिकारी यांचे समोर हजर करण्यात आले.
पोलिस निरीक्षक गावित यांच्या मार्गदर्शनखाली व्ही. व्ही. कोष्टी अधिक तपास करीत आहेत

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













