रत्नागिरी : कशेडी बोगद्यातील एक लेन गणेशोत्सवापर्यंत सुरू करण्यात येणार

banner 468x60

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील रायगड आणि रत्नागिरीला जोडणाऱ्या पोलादपूर येथील कशेडी घाटाला पर्यायी असलेल्या कशेडी बोगद्यातील एक लेन गणेशोत्सवापर्यंत सुरू करण्यात येईल, अशी माहिती नॅशनल हायवे अथोरिटी ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

banner 728x90

🔴 कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा आणि पाहा कोकणातल्या बातम्या 

आपल्या मोबाईलवर

https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi

👉🏻 जाहिरात आणि बातम्या देण्यासाठी संपर्क करा 9960151909

बोगदातील सुरक्षेची कामे जवळपास पूर्ण झाली आहेत. पावसाने जर का अजून दहा ते पंधरा दिवसांची उघडीप दिली तर या दोन महिन्यात केव्हाही बोगद्यातील सिंगल लेन गणेशोत्सवापर्यंत सुरू होऊ शकते.

मुंबईकडून गोव्याच्या दिशेने जाताना ही सिंगल वाहतूक लेन या कशेडी बोगद्यातून सुरू करण्यात येऊ शकते.मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास करताना पोलादपूर तालुक्यातील कशेडी हा अवघड वळणांचा महत्त्वाचा घाट पार करण्यासाठी तब्बल ४० ते ४५ मिनिटांचा कालावधी लागतो.

या घाटात अनेकदा जीवघेणे अपघातही होतात. कशेडी बोगद्यातील सिंगल लेन सुरू झाल्यास हा वेळ केवळ दहा मिनिटे पंधरा मिनिटांवर येणार आहे. त्यामूळे कोकण आणि गोव्यात जाणाऱ्या प्रवाशांचा प्रवास आता आणखी सुखकर होणार आहे.

गणेशोत्सवात मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटाला पर्याय असणारा बोगदा वाहतुकीसाठी सुरु झाल्यास पर्यटकांना चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. बोगद्याच्या आतील रस्त्याचे काँक्रेटीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. बोगद्याला जोडणाऱ्या जोड रस्त्यांचे कामही युद्ध पातळीवर अधिकची यंत्रणा लावून सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

२०१९ मध्ये तत्कालीन पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्या हस्ते श्रीफळ फोडून कंपनीने या बोगद्याच्या कामाला सुरुवात केली. डिसेंबर २०२३ पर्यंत या बोगद्याचे पूर्ण काम करून दोन्ही लेन सुरू करण्याची डेड लाईन प्रशासनाकडून ठेवण्यात आली आहे. सार्वजनिक राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी या बोगद्याची दोन वेळा पाहणी केली.

त्यानंतर रस्ते वाहतूक केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हेलिकॉप्टर मधून या मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील रस्त्याची पाहणी केली होती. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वळणवळणाच्या घाटातून प्रवास करण्यापेक्षा या बोगद्यातून चाकरमान्यांचा सुखकर प्रवास कोकणात व्हावा यासाठी या बोगद्यातील रस्त्यावरील काँक्रेटीकरण करण्याचे काम सध्या दिवस रात्र सुरू आहे.

दोन दिवसानंतर राज्याचे बांधकाम सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण या ठिकाणी येऊन त्याची पाहणी करणार आहेत. कशेडी घाटाला पर्याय म्हणून तयार झालेला बोगदा हा गणेशोत्सवाच्या आधी वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनीही काही दिवसांपूर्वीच एका पत्रकार परिषदेत दिली होती. मात्र, त्यानंतरही या बोगद्याच्या परिसरातले काम संथगतीने सुरू होते संबंधित ठेकेदाराला सिमेंटचाही अपुरा पुरवठा होत होता.

त्यामुळे कशेडी येथील स्थानिक नागरिकांनी याचा व्हिडिओ करून सोशल मीडिया वर व्हायरल केला होता. आता या बोगदातील कामाला वेग आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *