चिपळूणमधील वेश्या व्यवसायावर धडक कारवाई केल्यानंतर दापोली पोलिसांनी दापोलीत धडक कारवाई केली आहे.
दापोली शहरातील एका लॉजवर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग शाखा रत्नागिरी आणि दापोली पोलिसांनी कारवाई करत देहविक्री असल्याचा संशय व्यक्त करत एका महिलेला ताब्यात घेतले आहे.
गेले अनेक महिने शहरातील एका लॉजवर देहविक्री होत असल्याचा संशय स्थानिकांनी व्यक्त केला होता. त्या माहितीच्या आधारे गुरुवार दि. 4 जुलै रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग रत्नागिरी आणि दापोली पोलिसांनी संयुक्त कारवाई करीत त्या लॉजवर धाड टाकली.
यावेळी पोलिसांनी एक बनावट गिर्हाईक लॉजवर पाठवून वस्तुस्थितीची पाहणी केली. यावेळी एक महिला देहविक्री व्यवसाय करत असल्याचे समोर आले.
त्यांनी त्या महिलेला ताब्यात घेतली असून गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













