गुहागर: वरवेलीत ६ डिसेंबरला अस्थिकलशाचे दर्शन व महापरीनिर्वाण दिनाचे आयोजन

banner 468x60

भास्कर पेरे पाटील यांचे “डॉ. बाबासाहेब आंबेडकर “व “माझा गाव माझा विकास”या विषयांवर व्याख्यान

गुहागर (प्रतिनिधी) गुहागर तालुक्यातील बौध्दविकास मंडळ वरवेली (रजि.) या सामाजिक संस्थेच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १९८५ सालापासून वरवेली बुध्द विहारमध्ये स्थापित केलेल्या पवित्र अस्थिकलशाचे दर्शन व ६७ व्या महापरिनिर्वाण दिनाचे आयोजन करण्यात आले असून, या महामानवाला मानवंदना व अभिवादन आणि समाज प्रबोधन करण्यासाठी सायं. ६ वाजता परिवेण बुध्द विहार वरवेली येथे सभेचे आयोजन करण्यात आले आहे.सदर सभेला प्रमुख वक्ते म्हणून आपल्या व्याख्यानातून संपूर्ण देशाभरात यु-ट्यूब अॅपच्या माध्यमातून गाजलेले तसेच सरपंच पदावर असताना आपल्या कार्यकाळात गावाला विविध पुरस्कार प्राप्त करून देणारे बहुजनांचे व्याख्याते भास्कर पेरे पाटील (गाव पाटोदा, ता.जि. औरंगाबाद) हे “डॉ. बाबासाहेब आंबेडकर” व “माझा गाव माझा विकास”या विषयांवर व्याख्यान देणार आहेत. ते आपले ज्वलंत विचार या विचारमंचावर आपल्या पुढे मांडणार आहेत. या व्याख्यानाला जिल्ह्यातील सर्व सरपंच,उपसरपंच, ग्रा.प.सदस्य, अधिकारी वर्ग, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी व नागरिकांनी आपल्या मित्रपरिवारा समवेत या व्याख्यानाच्या कार्यक्रमाला उपस्थित रहावे, असे आवाहन बौध्द विकास मंडळ,वरवेलीच्या वतीने करण्यात आले आहे.
banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *