खेडमध्ये गोळीबार झालाच नाही, बनाव उघड, दगडाने फोडल्या काचा, पोलिसांना दिली खोटी माहिती

Screenshot

banner 468x60

खेड तालुक्यातील खोपी फाटा येथे मुंबई-गोवा महामार्गावर दोन व्यक्तींनी गोळीबार करून हल्ला केल्याची तक्रार काल शनिवारी सायंकाळच्या सुमारास घडली.

याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली होती. या तक्रारीची तात्काळ दखल घेत पोलिसांनी तपास सुरू केला असता, हा गोळीबाराचा बनाव असल्याचे समोर आले.

स्वतः केलेल्या अपघाताचे सत्य लपवण्यासाठी हा बनाव रचण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलीस अधिक तपास करत होते.

पोलिसांनी केलेल्या सखोल चौकशीत, तक्रारदार आणि एका अनोळखी मोटारसायकल चालकामध्ये वाद झाल्याचे उघड झाले. बाचाबाची आणि शिवीगाळ झाल्यानंतर मोटारसायकलस्वाराने तक्रारदाराच्या गाडीवर दगड फेकून मारला आणि तो निघून गेला.

यानंतर तक्रारदाराने आपल्या भावाला आपल्याला गोळी लागल्याची खोटी माहिती दिली. विशेष म्हणजे, यापूर्वीही तक्रारदाराने अज्ञात व्यक्तींकडून गोळीबार झाल्याची तक्रार दिली होती, परंतु त्यात कोणतेही तथ्य न आढळल्याने ती तक्रार खोटी ठरवून निकाली काढण्यात आली होती.

या संपूर्ण घटनेच्या अनुषंगाने, डायल ११२ प्रणालीवर चुकीची माहिती देणाऱ्या तक्रारदारावर खेड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून, या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *