मुंबईच्या उपनगरातून थेट कोकणात मडगाव पर्यंत सुरू झालेली ही पहिली रेल्वे आहे. त्यामुळेच रेल्वेला खेड येथे थांबा मिळेल अशी अनेकांची अपेक्षा होती. मात्र अपेक्षाभंग झाला आहे आता या नाराजीला शिवसेनेचे दापोली खेड मंडणगडचे आमदार योगेश कदम यांच्या पत्राने वाचा फोडली आहे.
यासंदर्भात थेट केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनीकुमार वैष्णव यांना पत्र लिहून आपली नाराजी स्पष्टपणे कळवली आहे. रत्नागिरी आणि चिपळूण असे दोनच थांबे रत्नागिरी जिल्ह्यात देण्यात आले आहेत. यावरूनच शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार योगेश कदम त्यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनीकुमार वैष्णव यांना थेट पत्र लिहून खंत व्यक्त केली आहे.
कदम म्हणाले, खेड थांब्याचा समावेश केल्यास त्यानंतर खेड थांब्याचा समावेश करण्यासाठी लागणारी अवघड प्रक्रिया टाळता येईल. CC-२९८/२०२४ दिनांक २७/०८/२०२४ ही रेल्वे सेवा वांद्रे, बोरिवली आणि कोकण रेल्वेच्या विविध गंतव्यस्थानांदरम्यान कनेक्टिव्हिटी वाढवण्याचे आश्वासन देत असताना, अंतिम मंजुरीमध्ये रत्नागिरी जिल्हयातील खेड, दापोली व मंडणगड या तीन तालुक्यांना जोडणारे महत्वपुर्ण असलेल्या खेड स्थानकाचा समावेश नाही याबद्दल खेद व्यक्त करण्यात आली आहे.
ही रेल्वे सुरू करण्यात आल्याबद्दल धन्यवाद देताना आपल्या या मागणीचा आपण विचार करून आपण योग्य असा प्रतिसाद द्याल अशी अपेक्षा आमदार योगेश कदम यांनी दिलेल्या पत्रामधून व्यक्त केली आहे. खेड येथे जादा रेल्वे सेवेची जोरदार आणि सातत्यपुर्ण मागणी होती. नव्या ट्रेनमुळे ही गरज पूर्ण होईल, अशी आशा अनेकांना होती.
अंतिम मंजुरीमध्ये खेड येथे थांबा वगळणे ही बाब निराशाजनक आहे. महत्वाच्या स्थानकावरुन प्रवास करणाऱ्या संभाव्य फायद्यांकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा स्पष्टपणे या पत्रात नमूद करण्यात आला आहे. सेवेच्या प्रारंभापासून खेड येथे थांबा समाविष्ट केल्याने मोठया संख्येने प्रवाशांसाठी तिची सुलभता आणि सुविधा मोठ्या प्रमाणात वाढेल.
हा थांबा आत्ता लागू केल्यास नंतरच्या तारखेला अतिरिक्त थांब्यांची विनंती करण्याची अवघड आणि अनेकदा लांबलचक प्रक्रिया टाळता येईल असे कदम म्हणाले आहेत.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













