खेड : संतकृपा संकुल पिरलोटे हॉलचा भव्य उद्घाटन सोहळा संपन्न

banner 468x60

खेड पिरलोटे येथील नव्या सामाजिक आणि सांस्कृतिक हॉल, “संतकृपा संकुल” चा उद्घाटन सोहळा २१ नोव्हेंबर २०२५ रोजी भव्य स्वरूपात पार पडला. या हॉलच्या उद्घाटन सोहळ्याचे प्रमुख अतिथी म्हणून माजी खासदार अनंत गीते,आमदार भास्कर जाधव (गुहागर विधानसभा) विक्रांत जाधव (जिल्हा प्रमुख)यांचे प्रमुख उपस्थित होते.

banner 728x90 banner 728x90

सोहळ्यात स्थानिक आणि राज्यस्तरीय विविध मान्यवर उपस्थित होते.
संतकृपा संकुलाची वैशिष्ट्ये लक्षात घेतल्यास, १००० ते १२०० लोकांच्या बैठकीची सोय, विवाह, साखरपुडा, वाढदिवस, पार्टी, सहलीच्या विद्यार्थ्यांनसाठी,मीटिंगसारख्या कार्यक्रमांसाठी अत्याधुनिक सुविधा, सुसज्ज पार्किंग व उत्तम भोजन व्यवस्थेसह मुंबई-गोवा हायवेमध्ये फक्त १०० मीटर अंतरावर असल्यामुळे हा हॉल स्थानिक तसेच जिल्ह्यातील कार्यक्रमांसाठी आदर्श ठिकाण ठरणार आहे.

उद्घाटन सोहळ्यात विविध स्थानिक आणि राज्यस्तरीय मान्यवर उपस्थित होते. चंद्रकांत चाळके (सरपंच, ग्रा.पं. लोटे), डॉ. श्यामसुंदर भाकरे (डायरेक्टर ऑफ रीलेशन, एम.ई.एस. पुणे), सुभाष मुकादम (डाऊ अॅग्रो केमिकल लि.),
अमोल अकुलकर(दिपक नोव्होकेम),, पोलीस निरीक्षक, खेड, तसेच अनेक उद्योग, सामाजिक संघटना व व्यक्तिगण उपस्थित होते. संपूर्ण सोहळा धार्मिक, सांस्कृतिक आणि औपचारिकतेचा संगम होता.

उपस्थित मान्यवरांनी या नवीन हॉलला स्थानिक सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनात मोठे योगदान देईल असे मानले. हॉलमध्ये आयोजित कार्यक्रमांमुळे स्थानिक लोकांसाठी तसेच प्रवासी लोकांसाठीही सुलभ सुविधा उपलब्ध होणार असल्याचे सांगण्यात आले.

संतकृपा संकुल हॉलच्या उद्घाटन सोहळ्यामुळे खेड आणि आसपासच्या भागातील सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमांची सुविधा अधिक समृद्ध होणार असल्याचे स्थानिकांनी स्पष्ट केले.
हॉल बुकिंग संपर्क
87668 45211
8080131771

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *