खेड तालुक्यातील संगलट गावचे सुपुत्र मझहर उमर नाडकर यांची कन्या डॉ. फलाह मझहर नाडकर हिने वैद्यकीय शिक्षणात उल्लेखनीय यश संपादन केले आहे. डॉ. फलाह यांनी २०२४ साली सांगली येथील प्रकाश मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएस पदवी पूर्ण केली आहे.

एमबीबीएसनंतर त्यांनी पुढील उच्च शिक्षणासाठी प्रयत्न सुरू ठेवत के. जे. सोमय्या मेडिकल कॉलेज, मुंबई येथे एम.डी. (अॅनेस्थेशिया) अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळवला आहे. त्यांच्या या यशामुळे संगलट गावासह संपूर्ण खेड तालुक्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
डॉ. फलाह यांच्या या यशामागे त्यांचे वडील मझहर उमर नाडकर यांचेही मोलाचे योगदान आहे. मझहर नाडकर हे पेशाने अभियंता असून सध्या मुंबईत प्रख्यात बांधकाम व्यवसायिक म्हणून ओळखले जातात.
डॉ. फलाह नाडकर यांच्या शैक्षणिक वाटचालीबद्दल कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार तसेच ग्रामस्थांकडून अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















