खेड : संगलट मोहल्ल्यातील गांजासह दोन तरुणांना सापळा रचून अटक

banner 468x60

खेड तालुक्यातील मुंबके ते कोरेगावदरम्यान गांजा विक्रीसाठी आलेल्या दोन तरुणांना पोलिसांनी सापळा रचून पकडले. राहिद अब्दुल रऊफ जमादार (३५) आणि मुरसलीन बशीर नाडकर (३०, दोघे रा. संगलट मोहल्ला) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

banner 728x90 banner 728x90


गोपनीय माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ कारवाई केली. तपासादरम्यान दोघांकडून १६२ ग्रॅम गांजा (किंमत ₹२,४२५), दोन मोबाईल फोन आणि इतर साहित्य मिळून एकूण ₹२२,४४५ किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ही कारवाई पोलिस निरीक्षक विवेक अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून, याबाबत पोलीस शिपाई विजेंद्र सातार्डेकर यांनी खेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *