खेड शहरातील रोझनीन जमिळ देसाई यांची शिवसेना (शिंदे गट) अल्पसंख्यांक महिला सेलच्या शहर अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.

खेड आणि दापोली येथील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटन अधिक भक्कम करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती देण्यात आली. सध्या तालुक्यात विविध पातळीवर सुरू असलेल्या फेरबदलांच्या मालिकेत ही नियुक्ती विशेष लक्षवेधी ठरली आहे.
या नव्या जबाबदारीनंतर रोझनीन देसाई यांना पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून हार्दिक शुभेच्छा देण्यात येत आहेत.
वंदनीय हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने तसेच शिवसेना मुख्य नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मान. एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार देसाई यांची ही नियुक्ती करण्यात आली आहे. अल्पसंख्यांक महिला सेलच्या शहराध्यक्षपदाचा त्यांचा कार्यकाळ एक वर्षाचा असेल.


हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण यांचा प्रसार, तसेच शिवसेना पक्ष संघटन वृद्धीसाठी सर्वांना सोबत घेऊन सक्रीयपणे कार्य कराल, असा विश्वास पक्षाने व्यक्त केला आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















