खेड : फोटोग्राफी असोसिएशनची नवी कार्यकारिणी जाहीर, रोहन राठोड अध्यक्षपदी

banner 468x60

खेड तालुक्यातील छायाचित्रकारांना संघटित करून त्यांच्या व्यवसायाला योग्य दिशा देण्याच्या उद्देशाने खेड फोटोग्राफी असोसिएशनच्या नव्या कार्यकारिणीची स्थापना करण्यात आली. या असोसिएशनचा पदग्रहण सोहळा काल खेड येथे उत्साहात पार पडला.

banner 728x90

माजी अध्यक्ष हर्षदीप उर्फ बाळा सासणे यांच्या अमूल्य मार्गदर्शनाखाली खेड फोटोग्राफी असोसिएशनची नवीन कार्यकारिणी स्थापन करण्यात आली. यावेळी पदग्रहण सोहळ्यात नव्या कार्यकारिणीची अधिकृत घोषणा करण्यात आली.

असोसिएशनच्या अध्यक्षपदी रोहन राठोड यांची निवड करण्यात आली आहे. उपाध्यक्षपदी यश साळवी, सचिवपदी आदर्श पाटील, खजिनदारपदी सुजित गांगण, सहसचिवपदी सिद्धेश मोरे, तर सहखजिनदारपदी आयुष खेडेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सोशल मीडिया व्यवस्थापनाची जबाबदारी मृणाल मडव यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.

कार्यकारिणी सदस्य म्हणून संजय शिगवण, मिलिंद कांनसावडे, मोहम्मद अली जास्नायक, राजेंद्र जाधव, प्रकाश जाधव, रोहन भिलारे आणि शुभम भुवड यांची नावे जाहीर करण्यात आली.

याच पदग्रहण सोहळ्यात नव्या कार्यकारिणीच्या वतीने माजी अध्यक्ष हर्षदीप उर्फ बाळा सासणे यांची खेड फोटोग्राफी असोसिएशनच्या सल्लागारपदी अधिकृत नियुक्ती करण्यात आली. आगामी कार्यकाळात त्यांच्या अनुभवाचा व मार्गदर्शनाचा लाभ घेतला जाणार आहे.

या कार्यक्रमास खेड व परिसरातील अनेक छायाचित्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. नव्या असोसिएशनमुळे छायाचित्रकारांमध्ये एकोपा निर्माण होऊन फोटोग्राफी व्यवसायाला योग्य दिशा मिळेल, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *