खेड : “या” दिवशी होणार वैभव खेडेकर यांचा पक्षप्रवेश

banner 468x60

वैभव खेडेकर यांच्यासह समर्थकांचा लांबणीवर पडलेला भाजप पक्षप्रवेश २३ सप्टेंबरला प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत होणार आहे.

banner 728x90 banner 728x90

वैभव खेडेकर यांच्यासह समर्थकांनी पक्षप्रवेशाची जय्यत तयारी केलेली असतानाच मराठा-ओबीसी आरक्षण मुद्दा चिघळल्याचे कारण देत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी पक्षप्रवेश स्थगित केला होता. यामुळे समर्थकांच्या तयारीवर पाणी फेरले होते.

खेडेकर व त्यांचे समर्थक पक्षप्रवेश तारखेच्या प्रतिक्षेत असतानाच पितृपंधरवड्यामुळे त्यात पुन्हा खोडा पडला आहे. अखेर २३ सप्टेंबरला प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *