मुंबई-गोवा महामार्गावरील महाडनजीक कारचा टायर फुटून लगतच्या दुभाजकावर आदळल्याने ५ जण जखमी झाले. रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकीस्वारालाही धडक दिल्याने तो देखील जखमी झाला.
जखमींना उपचारासाठी तातडीने महाड येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. संदीप गणेश चिपळूणकर (४५), अथर्व संदीप चिपळूणकर (१७), सबुरी संदीप चिपळूणकर (७), आतिथ्य चिपळूणकर (७), सतीश चिपळूणकर (१४, सर्व रा. चिपळूण) यांच्यासह राजेंद्र वसंत देशमुख (५७) या दुचाकीस्वाराचा जखमींमध्ये समावेश आहे.
अपघातामुळे काही काळ वाहतूक खोळंबली. चिपळूण येथील संदीप चिपळूणकर हे इर्टिगा कार (एम.एच.०८/ए.जे.८०१९ क्रमांकाची) घेवून चिपळूणहून मुंबईच्या दिशेने जात होते. कारचा टायर अचानक फुटल्याने कारवरील नियंत्रण सुटून दुभाजकावर आदळली.
याचदरम्यान, रस्त्यावरून जात असलेल्या दुचाकीस्वाराला धडक दिली. अपघाताचे वृत्त कळताच महाड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना मदतकार्य केले.
अपघातग्रस्त वाहने बाजूला हटवल्यानंतर विस्कळीत वाहतूक पूर्ववत झाली. अपघातात इर्टिंगा कारच्या दर्शनी भागाचा चेंदामेंदा झाला. अपघात नेमका कसा घडला, याचा महाड पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













