खेड : एम.ई.एस. ए.एम. परशुराम हॉस्पिटलला ईएसआयसी मान्यता, कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध

banner 468x60

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी संचलित ए.एम. पर्शुराम हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, घाणेखुंट–लोटे यांना कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ESIC) अंतर्गत अधिकृत टाय-अप (Tie-up) मिळाल्याची आनंदाची बातमी आहे.
या टाय-अपमुळे ईएसआयसी अंतर्गत नोंदणीकृत कामगार व त्यांच्या कुटुंबीयांना ए.एम. पर्शुराम हॉस्पिटलमध्ये ओपीडी, आयपीडी, विविध तपासण्या, निदानात्मक सेवा तसेच आवश्यक उपचार ईएसआयसी योजनेंतर्गत उपलब्ध होणार आहेत.

banner 728x90

ग्रामीण व औद्योगिक परिसरातील कामगारांना दर्जेदार, सुलभ व वेळेवर आरोग्यसेवा मिळावी या उद्देशाने हा करार अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. हॉस्पिटलमध्ये अनुभवी डॉक्टर, आधुनिक वैद्यकीय उपकरणे व रुग्णकेंद्रित सेवा उपलब्ध असून या मान्यतेमुळे परिसरातील कामगार वर्गाला मोठा दिलासा मिळणार आहे.

यावेळी सात्विणगावचे सरपंच दिवाळे, उपसरपंच पड्याळ, ग्रामस्थ, तसेच परशुराम वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उत्पात, अधीक्षक डॉ. अलमान, वैद्यकीय व नर्सिंग महाविद्यालयाचे प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते.

एम.ई.एस. ए.एम. पर्शुराम हॉस्पिटल व्यवस्थापनाने ईएसआयसी अधिकाऱ्यांच्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त करत, भविष्यातही गुणवत्तापूर्ण व रुग्णाभिमुख आरोग्यसेवा देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *