खेड : मनसेचे संपर्क प्रमुख प्रमोद गांधींचा खेड दौरा

banner 468x60

येणाऱ्या निवडणुकीसाठी मनसेने कोकणात कंबर कसलीय. दापोली, खेड गुहागर विधानसभा मतदारसंघात मनसेला चांगला प्रतिसाद मिळत असून विधानसभा निवडणुकीसाठी गुहागरचे मनसे संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी हे तालुक्याचा दौरा करत आहे.

विधानसभा निवडणुकीत प्रमोद गांधी इच्छुक असल्याने त्यांनी जनसंपर्क साधण्याबरोबर,गावभेटीतून नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी दौरे सुरु केलेत.

प्रभाकर सोलकर यांच्या घरी गांधी यांनी गणपती बापाच्या दर्शनासाठी घेतले. त्याचबरोबर वाडीतील ग्रामस्थ मुंबई चाकरमानी यांच्या सोबत गाव मिटींग संपन्न झाली. सदर गावभेटीतून संवाद साधताना ग्रामस्थांबरोबर गाव /वाडी विकासावर विविधांगी चर्चा झाली,सदर गावभेटीला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे गांधी यांनी सांगितले.

सदर गावभेटी मिटींगला गुहागर तालुका अध्यक्ष सुनील हळदणकर ,खेड तालुका अध्यक्ष निलेश बामने, खेड उपतालुका अध्यक्ष तुषार खोपकर, विभाग अध्यक्ष अश्विन उतेकर, मुंढर तालुका अध्यक्ष सुजीत गांधी , सोहम गांधी आदी कार्यकर्ते पदाधिकारी व मनसे सैनिक तसेच प्रभाकर सोलकर,विनोद उतेकर, राकेश पवार, म्हसकर,कांगणे आदी ग्रामस्थ कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *