खेड : लोटेमाळची कन्या तन्वी रेडीज हिला लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिन सोहळ्याचं निमंत्रण

banner 468x60

योगासन क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीमुळे लोटेमाळ गावाच्या मातीला अभिमान वाटावा अशी ऐतिहासिक घटना घडली आहे.

लोटेमाळ गावची कन्या व सुवर्णपदक विजेती तन्वी भूषण रेडीज हिला यंदाच्या १५ ऑगस्ट २०२५ रोजी दिल्लीतील लाल किल्ल्यावर होणाऱ्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यास उपस्थित राहण्यासाठी भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाकडून विशेष निमंत्रण मिळाले आहे.

banner 728x90


देशाच्या पंतप्रधानांच्या उपस्थितीत होणाऱ्या या राष्ट्रीय सोहळ्यात सहभागी होणे ही तन्वीच्या क्रीडा प्रवासातील आणखी एक अभिमानाची नोंद ठरणार आहे. तन्वीने याआधी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये महाराष्ट्राचा आणि देशाचा मान उंचावला आहे.


यामुळे सर्वत्र आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण आहे. ग्रामस्थ, मित्रपरिवार आणि नातेवाईक तन्वीच्या या यशाचा मनापासून गौरव करत आहेत. लोटेमाळ गावाचा नाव देशभर गाजवणाऱ्या या यशस्वी कन्येला मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्यात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *