खेड येथील मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्यानजीक झालेल्या अपघातात वॅगनार कारमधील ६ जण जखमी झाले. ६ जणांच्या दुखापतीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी भरत प्रभाकर पवार (रा. वेरळ, खेड) या वॅगनार कारचालकावर गुरुवारी सायंकाळी उशिरा येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
संतोष आनंद घाडगे, नीलम संतोष घाडगे (रा. कल्याण-ठाणे), राजेश हिरालाल मोहील यांच्यासह जयश्री अरविंद बारिया, रोशन अरविंद बारिया, जयश्री अरविंद बारिया अशी जखमींची नावे आहेत.
जखमींना उपचारासाठी कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. संतोष घाडगे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. ते आयटेन स्पोर्टस व्हॅन (एम.एच.०५/सी.एम.४६५८) घेवून कशेडी बोगदा पार करुन पुढे १ कि.मी. अंतरावर आले.
याचदरम्यान, भरत पवार हा वॅगनार कार (एम.एच.०५/एफ.पी.७५१४) घेवून जात असताना व्हॅनला धडक दिली. अपघातामुळे काही काळ वाहतूक खोळंबली होती.
कशेडी येथील वाहतूक पोलीस मदत केंद्रातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहचून जखमींना मदतकार्य केले.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta Live, Media Network
Rg.No.MH-28-0047569 Ratnagiri, Dapoli
Editor – Tejas Borghare
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*