खेड तालुक्यातील काडवली-गजवाडी येथे नवीन सार्वजनिक विहिरीच्या खोदाईसाठी ठेवलेले १० लाख रुपये किमतीचे जेसीबी कंपनीचे ब्रेकर मशीन चोरट्याने लंपास केल्याची तक्रार येथील पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली.
ही घटना १ ते २ मार्च या कालावधीत घडल्याचे प्रल्हाद प्रकाश लाड यांनी तक्रारीत नमूद केले आहे.लाड यांच्या मालकीचे जेसीबी मशीन नवीन सार्वजनिक विहिरीच्या खोदाई कामासाठी ठेवले होते. तीन टन वजनाच्या मशीनसह इतर सुटे भाग चोरट्याने लांबवले.
मशीन व सुटे भाग चोरीस गेल्याचे निदर्शनास येताच पोलीस स्थानक गाठून तक्रार नोंदवली. याबाबतचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















