खेड तालुक्यातील भरणे येथे जुन्या वादाचा राग मनात धरून एका तरुणावर दगडाने हल्ला केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी अनिकेत साळुंखे आणि अजिंक्य साळुंखे (रा. भरणे, आठवडा बाजार परिसर) यांच्याविरोधात खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी सनी नारायण भोसले (वय २६, रा. भरणे) यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार, सनी भोसले हे दुचाकीवरून खेड येथून भरणेकडे जात असताना आरोपींनी जुन्या वादातून त्यांच्या डोक्यात दगड मारून हल्ला केला. या हल्ल्यात भोसले जखमी झाले आहेत.
घटनेचा पुढील तपास खेड पोलीस करत आहेत.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













