खेड : गेली 24 वर्षे देशसेवा केलेल्या खेड तालुक्यातील खवटी, सातपाने वाडीचे जवान ऑर्ड. नायब सुभेदार आणि गणेश बंडू शेलार हे सैन्यदलातून सेवानिवृत्त झाले.
भारतीय सैन्यदलात भारतमातेचं रक्षण करीत होते. त्यांनी सैन्यदलात प्राणाची पर्वा न करता अहोरात्र देशाच्या सीमांचे २४ वर्षे रक्षण केले. ते भारतीय सैन्यदलातून सेवानिवृत्त होऊन आपल्या मायभूमीत परत आले.
त्यावेळी गावच्या ग्रामस्थांनी त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करती वाजतगाजत त्यांचा सन्मान केला.वाडीच्या वतीने त्यांची जंगी स्वागत मिरवणूक आणि त्यांच्यासह वाडीतील सर्व माजी सैनिक बंडू शेलार, तानाजी शेलार, संजय जाधव, राजेश शेलार, अनिल शेलार, संजय शेलार, जनार्दन कदम, ज्ञानेश्वर शिंदे यांचा ही सत्कार अंबरनाथ येथे करण्यात आला.
या कार्यक्रमाला ठाणे जिल्हाचे माजी उप महापौर रमाकांत मढवी , शिवसेनेचे दिवा विभाग प्रमुख विनोद दादा मढवी, उप शाखा प्रमुख आणि विशेष कार्यकारी अधिकारी नरेश बंडु शेलार, तळे गण उबाठा संपर्क प्रमूख देवेंद्र मोहन कदम, मनसे शाखा अध्यक्ष अंबरनाथ प्रभाग क्रमांक ५१ सुशील पवार , समाजसेवक दिनेश गायकवाड, जे पी सिंपोनी अध्यक्ष महेंद्र गायकवाड उपस्थित होते. तसेच कार्यक्रमाला सामाजिक क्षेत्रातील खेड तालुका कोकण रहिवाशी मंच दिवा, जल फाउंडेशन कोकण विभाग, माडवणी देवी महिला मंडळ, निवृत्ती कदम, ज्ञानेश्वर शेलार, एकनाथ कदम, जयवंत महाराज निकम, प्रकाश जाधव, नामदेव शिंदे, गणेश जाधव इत्यादी उपस्थित होते.
सत्कार मूर्ती माजी सैनिक यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की सैन्यदलात असताना अनेक संकटाना सामोरे जावे लागले पण भारत मातेचे रक्षण हेच ध्येय ठेवून संकटाना सामोर गेलो तसेच माझी आई माडवणी देवी ही माझ्या कायम पाठीशी असते आणि सैन्यदलात भर्ती करण्यासाठी माझी मोठी बहिण बहीण सुनिता प्रकाश जाधव, भावजी प्रकाश पांडूरंग जाधव, मोठा भाऊ राजेश बंडु शेलार यानी खूप मेहनत घेतली .
सैन्यदलात असताना माझी पत्नी नीलम शेलार, चुलते संजय शेलार, गोविंद बाबा शेलार, नामदेव शेलार भाऊ मंगेश शेलार, नरेश शेलार, वडील बंडु शेलार, बहीण अनिता निकम, संगीता कदम, आत्या मंगल चिकने, अनिता कदम काकी, शैला राऊत काकी यांचा भावनिक आधार होता तसेच आई गंगाबाई शेलार, आत्या आत्या सुमन सकपाळ,. मामा सुभाष कदम यांचा ही आशीर्वाद होता .
अश्या भावना त्यांनी व्यक्त केल्या. माडवणी देवी मित्र मंडळाच्या वतीने शिवजी महाराज शेलार आणि विशाल जाधव यांनी शाब्दिक शुभेच्या दिल्या आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माडवणी देवी मित्र मंडळाचे सचिव अमोल पांडुरंग शेलार यांनी केले.
वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta Live, Media Network
Rg.No.MH-28-0047569 Ratnagiri, Dapoli
Editor – Tejas Borghare
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*