मुंबई–गोवा महामार्गावरील भरणे येथील जगबुडी पुलावर शनिवारी दुपारी सुमारे ३.३० वाजता एक भीषण अपघात घडला. एम.एच. ०८ बी.ई. ३९७९ क्रमांकाची कार पुलावरून मार्गस्थ असताना अचानक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार पुलालगत असलेल्या संरक्षक भिंतीवर आदळली व जोरात उलटली.

अपघाताचा धक्का इतका जोरदार होता की कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मात्र, सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही किंवा कोणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती आहे. अपघातानंतर काही काळ मुंबई–गोवा महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती, त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणा आणि पोलीस प्रशासन तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. अपघातग्रस्त वाहन बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली. प्राथमिक तपासानुसार चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, जगबुडी पुलावर यापूर्वीही अपघातांच्या घटना घडल्या असून वाहनचालकांनी या मार्गावरून प्रवास करताना अधिक सावधगिरी बाळगावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून अपघाताचे नेमके कारण शोधले जात आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













