खेड शहरातील बस स्थानकाजवळील विदर्भ कोकण बँकेत कार्यरत ३२ वर्षीय तरुणीने भाड्याच्या खोलीत गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली.
सुप्रिया विनायक वनशा (सध्या रा. पाटणे संकुल कुंभारआळी, मूळगाव – भाईंदर, ठाणे) असे या मृत तरुणीचे नाव आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. तिने नैराश्यातून आत्महत्या केल्याचे समजते. तरीही नेमक्या कोणत्या कारणातून तिने आत्महत्या केली आहे
याचा पडताळा येथील पोलिसांकडून करण्यात येत आहे. ही तरुणी कुंभारआळी येथील पाटणे संकुलात भाड्याने वास्तव्यास होती. या खोलीतच तिने गळफास लावून आत्महत्या केली. बराच कालावधी उलटूनही कोणताही प्रतिसाद न आल्यामुळे ती राहत असलेल्या खोलीचा दरवाजा तोडण्यात आल्यानंतर तिने आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला.
याबाबत येथील पोलीस ठाण्यात कळवल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. तिने नेमकी आत्महत्या का केली, याबाबत येथील पोलिसांकडून सखोल तपास करण्यात येत आहे. आत्महत्येबाबत डायरीत नोंद आहे का, याबाबत चाचपणी करण्याचे काम सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होते. घटनेत गांभीर्याने लक्ष घातले असून तरुणीच्या आत्महत्येचे नेमके कारण शोधण्यात पोलीस यंत्रणा गुंतली आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















