खेड : 2 पोलीस कर्मचाऱ्यासह होमगार्डच्या जवानाला धक्काबुक्की, वेरळ येथील प्रकार

banner 468x60

बाबा दर्गाजवळ दोघांमध्ये झालेली बाचाबाची व वादविवाद सोडवण्यासाठी गेलेल्या 2 पोलीस कर्मचाऱ्यासह होमगार्डच्या जवानास धक्काबुक्की करत सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी शैलेश चव्हाण (वेरळ-खेड) यांच्यावर येथील पोलीस ठाण्यात मंगळवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला.

banner 728x90

या बाबत होमगार्ड दलाचे फ्लाटून कमांडर सचिन कडू यांनी तक्रार नोंदवली.वेरळ येथील पीर हजरत जलालशहा बाबा यांचा 18 फेब्रुवारीला उरूस होता.

यावेळी शैलेश चव्हाण व झुलेवाला पंकज निळकंठ ठाकूर (रा. माणगाव) यांच्यात किरकोळ कारणावरून बाचाबाची झाली.

येथे पोलीस बंदोबस्तासाठी असलेल्या महिला पोलीस हेडकॉन्स्टेबल साळवी, पोलीस हेडकॉन्स्टेबल कटनाक व होमगार्ड सचिन हरिश्चंद्र कडू हे वादविवाद सोडवण्यासाठी गेले असता धक्काबुक्की करत कटनाक यांच्या डाव्या हातावर नखाने ओरबाडले.

या प्रकरणानंतर वाद घालणाऱ्या दोन्ही व्यक्तींना पोलीस ठाण्यात घेवून जात असताना संशयिताने पोलीस अधिकारी व ठाणे अंमलदार यांच्यासमोर होमगार्डचे सचिन कडू यान दरडावून बघून घेईन, अशी धमकी देत कॉलर पकडली.

सरकारी कामात अडथळा आणल्याचा ठपका ठेवत संशयितावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *