खेड : 15 ऑगस्टचे औचित्य साधून खेड कोतवली येथे विद्यार्थ्यांना परीक्षा पॅडचं वाटप, इरफान सय्यद यांचं विशेष सहभाग

banner 468x60

15 ऑगस्टचे औचित्य साधून खेड कोतवली येथे विद्यार्थ्यांना एक्झाम पॅडचे वाटप करण्यात आलं. खेड कोतवली जि. प. शाळा कोतवली 1 .2.3,जि. प.शाळा असगणी उर्दू ,जि. प. आदर्श शाळा असगणी नं. २ येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

यानिमित्ताने जिल्हा परिषद शाळेत विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. ध्वजारोहणानंतर विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात एक्झाम पॅडचे वाटप करून विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी आवश्यक साधनसामग्री उपलब्ध करून देण्यात आली.

banner 728x90

शालेय मुख्याध्यापक, शिक्षक, ग्रामपंचायत सदस्य तसेच पालक या वेळी उपस्थित होते.गुहागर, खेड तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमधील 500 हून अधिक विधार्थ्याना एक्झाम पॅडचे वाटप करण्यात आले.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे , शिवसेना नेते रामदास कदम,खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, गृहराज्य तथा नगरविकास राज्यमंत्री योगेश कदम , शिवसेना उपनेते, कामगारमित्र इरफानभाई सय्यद यांच्या प्रेरणा व मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवला गेला या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाची साधने उपलब्ध करून देणे, त्यांची शैक्षणिक प्रगती साधणे आणि भविष्यकाळात ते सक्षम, सुशिक्षित व देशाभिमानी नागरिक घडवणे हा आहे.


खेड शिवसेना उपतालुकाप्रमुख संदीप आंब्रे युवासेना शाखाप्रमुख धामणदेवी विभाग प्रमुख आदिल मिठागरी यांचे विशेष सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *