व्हेल माशाच्या उलटी तस्करी प्रकरणात चौघांना मुद्देमालासह जेरबंद केल्यानंतर फरार असलेल्या पाचव्या संशयित आरोपीच्या मागावर वनविभागाचे पथक आहे. यामध्ये आंतरराष्ट्रीय रॅकेटचा संशय असल्याने त्यादृष्टीने वनविभागाकडून तपास सुरू करण्यात आला आहे.
व्हेलच्या उलटी संदर्भात माहिती मिळाल्यानंतर वनविभागाने पंधरा दिवसांपासून लावलेल्या सापळ्यात मंगळवारी मंडणगड, दापोलीतील एका डॉक्टरसह चौघेजण मुद्देमालासह ताब्यात घेतलं आहे.
प्रकाश तुकाराम इवलेकर, दिलीप पांडुरंग पाटील, प्रविण प्रभाकर जाधव, अनिल रामचंद्र महाडीक यांच्यावर वन्यजीव अधिनियम 1972 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्यांच्याकडून महामार्गावर वालोपे येथील पेट्रोल पंपावर तीन किलो, तर फरारी सूत्रधारांच्या दापोलीतील घरावर छापा मारून सात किलो अशी एकूण दहा किलो उलटी जप्त करण्यात आली आहे.
दरम्यान, गुन्हा दाखल झालेल्या चारही संशयित आरोपींना बुधवारी न्यायालयात हजर केले असता एक दिवसांची पोलीस कोठडी मिळाली. गुरूवारी मुदत संपल्यानंतर त्यांना पुन्हा न्यायालयासमोर हजर करण्यात आले.
दरम्यान, या प्रकरणात गुन्हा दाखल झालेल्या चौघांची दापोलीतील ही उलटी मिळवली होती. त्याचे नाव पुढे आल्यानंतर वनविभागाच्या पथकाने त्यांच्या निवासस्थानावर छापा मारत सात किलो उलटी जप्त केली. मात्र तो फरारी असल्याने आता त्या वनविभागाच्या पथकाकडून शोध घेतला जात आहे.
वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta Live, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
Editor – Tejas Borghare
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*