IND vs PAK: विराट कोहलीचं शानदार शतक अन् भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय, टीम इंडियाने घेतला २०१७ च्या पराभवाचा व्याजासकट बदला

banner 468x60

विराट कोहलीच्या शतकाच्या जोरावर भारताने पाकिस्तानविरूद्ध ६ विकेट्सने मोठा विजय मिळवला आहे. या विजयासह भारताने पाकिस्तानकडून २०१७ च्या फायनलमधील विजयाचा बदला घेतला आहे. कारण भारताने पाकिस्तानला पराभूत केल्याने चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मधील त्यांचे आव्हान संपुष्टात आणले आहे.

banner 728x90 banner 728x90

विराट कोहलीने जबरदस्त पुनरागमन करत पाकिस्तानविरूद्ध शतक झळकावले आणि भारताचा विजय निश्चित केला. विराट कोहलीने विजयी चौकार लगावला आणि भारताला विजय मिळवून दिला आणि स्वत: चे शतकही पूर्ण केले आहे. आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात महामुकाबला पार पडला. या सामन्यात भारताने उत्तम कामगिरी करत पाकिस्तानवर 6 विकेट्स राखून दणदणीत विजय मिळवला.

पाकिस्तानने भारताला दिलेले २४२ धावांचे आव्हान दिले होते. भारताने हे आव्हान 42.3 षटकात पूर्ण केले. या विजयासह भारत गुणतालिकेत अव्वल स्थानी पोहोचला आहे.

या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर भारताकडून कर्णधार रोहित शर्माने 20 धावा, शुभमन गिलने 46, विराट कोहलीने 100, श्रेयस अय्यरने 56, हार्दिकने 8 धावा केल्या. यामुळे भारताचा विजय सुकर झाला. भारत या मैदानावर अजूनही अपराजित आहे. भारताने या मैदानावर आतापर्यंत ७ सामने खेळले. या सगळ्या सामन्यात भारताने आतापर्यंत विजय मिळवला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *