चिपळूण शहरात बुधवारी दुपारी एक संतापजनक आणि भयावह घटना घडली. एका खाजगी शाळेत शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर तिच्याच शाळेच्या व्हॅन चालकाने विनयभंग केला.
या घटनेने संपूर्ण शहर हादरले असून, पालकवर्ग, शिक्षक आणि नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, बुधवार, दि. १५ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. विद्यार्थिनी शाळा सुटल्यानंतर नेहमीप्रमाणे शाळेच्या व्हॅनमधून घरी जात होती. मात्र, व्हॅन चालक वहाब खालिद वावेकर (रा. गोळकोट रोड, चिपळूण) याने संधीचा गैरफायदा घेत तिच्यावर अश्लील वर्तन करत विनयभंग केला.
सर्व विद्यार्थिनींना घरोघरी सोडल्यानंतर वावेकरने एका विद्यार्थिनीला गाडीतच थांबवले. एकटी असल्याचे पाहून त्याने तिच्याशी अश्लील चाळे करण्याचा प्रयत्न केला. पीडित विद्यार्थिनीने प्रतिकार करत आरडाओरड केली. त्याने गाडीतून तिला घरी सोडले. मात्र घरी गेल्यानंतर घाबरलेल्या मुलीला पाहून आई वडील चिंतेत पडले. त्यांनी तिला याबाबत विचारणा केली असता तिने सारा प्रकार सांगितला. संतापलेला आई वडिलांनी मुलीला घेऊन ताबडतोब चिपळूण पोलिस ठाणे गाठले.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनाही तपासाची चक्रे गतिमान केली. वहाब वावेकरला अटक केली. त्याला पोलिस ठाण्यात आणण्यात आले आहे. त्याच्यावर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पालकांनी तिची विचारपूस केली असता तिने पूर्ण प्रकार सांगितला. संतप्त पालकांनी तातडीने चिपळूण पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. दरम्यान या प्रकरणानंतर संशयिताने मुलीच्या घरी जाऊन माफी मागितली मात्र संतप्त झालेल्या पालकांनी त्याला चोप दिला आहे. यानंतर विरोधात देखील तक्रार दाखल केली आहे.
पोलीस विभागाने घटनेचे गांभीर्य ओळखून त्वरीत हालचाली करत आरोपी वहाब खालिद वावेकर याला अटक केली. त्याच्यावर POCSO (Protection of Children from Sexual Offences) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सांगितले की, आरोपी गेल्या काही वर्षांपासून शाळकरी विद्यार्थ्यांची ने-आण करत होता.
या प्रकारामुळे शहरात संतापाची लाट उसळली असून, अनेक सामाजिक संघटना, महिला मंचे आणि स्थानिक कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. त्यांनी या घटनेचा तीव्र निषेध करत आरोपीला कठोरात कठोर शिक्षा – म्हणजेच फाशीची शिक्षा – देण्याची मागणी केली आहे.
घटनेनंतर अनेक पालकांनी शाळांच्या व्यवस्थापनांकडे आणि प्रशासनाकडे खालील मागण्या केल्या आहेत: शाळा वाहन चालकांची पार्श्वभूमी तपासणी अनिवार्य करावी. सीसीटीव्ही कॅमेरे, महिला सहाय्यक यांची व्यवस्था शाळा वाहनांमध्ये करावी. पालक-शाळा संवाद प्रणाली अधिक मजबूत करावी.
वाहतूक यंत्रणांची नियमित तपासणी व सुरक्षा प्रशिक्षण असावे.
चिपळूण पोलीस विभाग प्रकरणाचा कसून तपास करत असून, सर्व पुरावे गोळा करण्यात येत आहेत. सविस्तर तपास सुरु आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













