चिपळूणमध्ये मगर पुन्हा शहरात

banner 468x60

गेल्या महिन्यात रस्त्यावर आलेल्या मगरीचा व्हिडिओ वायरल झाल्यानंतर पुन्हा एकदा चिपळूणमध्ये मगर शहरात आलीय. वाशिष्ठी नदीकिनारी असलेला पाणथळ भागही नष्ट झाला आहे.

त्यामुळे मगरींचा अधिवास धोक्यात आला असून, पावसाळ्यात मगरी भरवस्तीत फिरत आहेत. लोकवस्तीमध्ये फिरणाऱ्या या मगरी माणसावर हल्ला करत नाहीत;

परंतु या मगरी पाहून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. शहरातील विरेश्वर तलाव, रामतीर्थ तलाव, नारायण तलावमध्ये मगरी आहेत. विरेश्वर तलावातील मगरी उन्हाळ्यात सुक्या भागावर येऊन थांबतात.

उन्हाळ्यात रामतीर्थ तलावामध्ये या परिसातील गुरे पाणी पिण्यासाठी येतात नारायण तलावातील मगरीही उन्हाळ्यात लोकांच्या नजरी पडतात. गोवळकोट गावाच्या आधी रस्त्याच्या कडेला डोह आहे, त्यातसुद्धा अनेक मगरी आहेत. वाशिष्ठी खाडीमध्ये आणि नदीमध्ये मगरीचा वावर मोठ्या प्रमाणावर आहे. खाडीकिनारी असणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या मगरी पाहण्यासाठी येथे फेस्टिवलही भरवले जाते.

वाशिष्ठी नदीतील नगरी पावसाळ्यात शहरात येतात. पावसाळ्यात या मगरी पाण्याच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जात असताना शहरातील सखल भागात साचणाऱ्या पाण्यात थांबत होत्या. जुलै २०२१ च्या महापुराने चिपळूण शहराचे कोट्यवधीचे नुकसान केले. त्यानंतर वाशिष्ठी नदीतील गाळ काढण्याचा निर्णय घेण्यात आला.

नदीचे पात्र रूंद करण्यात आले. त्या वेळी वाशिष्ठी नदीच्या किनारी मगरीचा असलेला अधिवास नष्ट करण्यात आला. नदीतील गाळ काढून तो शहरातील सखल भागात टाकण्यात आला.

त्यामुळे मगरींचा पावसाळ्यातील तात्पुरता अधिवास नष्ट झाला. त्यामुळे वाशिष्ठी नदीतून बाहेर पडणाऱ्या मगरी रस्त्यावर आणि लोकवस्तीमध्ये आढळत आहेत.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *