चिपळूण : लायन्स क्लब सावर्डे यांच्या कडून एजाज इब्जी यांचा गुणवंत शिक्षक पुरस्काराने गौरव

banner 468x60

लायन्स क्लब सावर्डे यांच्या कडून एजाज इब्जी यांचा गुणवंत शिक्षक पुरस्काराने गौरव करण्यात आला आहे.एजाज इब्जी हे एक उत्तम मार्गदर्शक, सामाजिक बांधिलकी जपणारे

banner 728x90

शिक्षक असून विद्यार्थ्यांना फक्त आपल्या शाळे पर्यंत नव्हे तर त्यांना पुढील शिक्षणासाठी तसेच वेगवेगळ्या शासकीय लाभासाठी त्यांना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी मार्गदर्शन त्यांनी केला आहे.

एजाज इब्जी यांचा शैक्षणिक बाबतीत त्यांची उल्लेखनीय कामगिरी , मनमिळावूपणा , कार्यकुशलता , निर्भिड, अभ्यासू ,अन्याया विरुद्ध आवाज बुलंद करणारा समाजसेवक तसेच सामाजिक क्षेत्रात ही त्यांचे मोलाचे योगदान आहे.

गोरगरिबांना तसेच अशिक्षित लोकांना वेगवेगळे दाखले काढणे, त्यांचे सर्व प्रकारचे फार्म भरुन देणे. ते स्वत: दिव्यांग असून ही लोकांची कामे आनंदाने करतात.

म्हणून जिल्ह्यात त्यांचे नावलौकिक आहे. सावर्डे लायन्स क्लब यांच्या कडून लायन्स गुणवंत शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले.

यावेळी लायन्स क्लब अध्यक्ष सतीश सावर्डेकर, लायन अरविंद भंडारी, राष्ट्रपाल सावंत, लायन डाॅ. विरेंद्र चिखले, लायन डाॅक्टर निलेश पाटील, लायन व्याघ्रांबर नेहतराव, लायन अजय उपरे, लायन प्रकाश राजेशिर्के, गोविंदराव निकम हायस्कूल चे प्राचार्य मान .वारे , इब्जी गुरुजींच्या सौभाग्यवती समाजसेविका रिझवाना इब्जी, नातेवाईक, मित्रपरिवार आदी उपस्थित होते. सर्वांनी इब्जी गुरुजींना मन:पूर्वक शुभेच्छा दिल्या.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *