दापोली : लाडघर येथे हॉटेल व्यावसायिकांची कार्यशाळा संपन्न

banner 468x60

लाडघर पर्यटन विकास संस्था लाडघर आयोजित एक दिवसीय आदरातिथ्य व हॉटेल व्यवस्थापन या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

banner 728x90

कोकण पर्यटनाचा शाश्वत विकास, ग्रामीण कोकण व पर्यटनाच्या संधी, कोकणातील जैवविविधता, आदरातिथ्य व हॉटेल व्यवस्थापन या विषयांवर या एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यशाळेमध्ये लाडघर येथील तब्बल ५० पेक्षा अधिक हॉटेल व्यवसायिकांनी उत्स्फूर्त सहभाग दर्शविला. या कार्यशाळेचे आयोजन हॉटेल व्यवसायिक नरेश पेडणेकर, मंगेश मोरे व दीपक विचारे यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते.

या कार्यशाळेसाठी प्राध्यापक कुणाल मंडलिक हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. या कार्यशाळेनंतर कोकणातील स्थानिक व्यावसायिकांना निश्चितपणे त्याचा फायदा होईल, हॉटेल व्यवसायासंदर्भातील व्यवस्थापन याचे उत्तम प्रशिक्षण प्रात्यक्षिकांद्वारे दाखवण्यात आले,

या प्रकारच्या कार्यशाळा कोकणातील व्यावसायिकांना गरजेच्या असून त्याचे सातत्याने नियोजन होणे आवश्यक असल्याचे मत उपस्थित व्यवसियिकांनी केले, अशा प्रकारच्या कार्यशाळेनंतर कोकणातील व्यावसायिक समृद्ध होऊ शकतील असा विश्वास पेडणेकर यांनी व्यक्त केला.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *