रत्नागिरी तालुक्यातील कशेळी फाटा येथे रेस्टॉरंटमध्ये घरगुती गॅस वापरल्या प्रकरणी महिलेविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना सोमवारी (ता. २) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास कशेळीफाटा येथे निसर्ग रेस्टॉरंट येथे घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित महिलेने तिच्याकडे रेस्टॉरंट चालविण्याचा कोणताही अधिकृत परवाना नसताना त्यामध्ये घरगुती वापराचा एचपी कंपनीचा गॅस वापरला.
या प्रकरणी फिर्यादी राकेश श्रीकृष्ण विलणकर (वय ४९) यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी अन्न सुरक्षा माणके कायदा २००६ चे कलम ३१ (१) सहवाचन कलम २६, ६३, जिवनावश्यक वस्तु कायदा कलम ३, ७ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास ग्रामीण पोलिस अमंलदार करत आहेत.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















