नॅशनल हायस्कूल मांदिवली येथे हिंदी दिवस साजरा

banner 468x60

दि यंग पीपल्स एज्युकेशन सोसायटी मुंबई संचलित नॅशनल हायस्कूल मांदिवली येथे हिंदी दिवस उत्साहात साजरा झाला. कार्यक्रम अध्यक्षस्थानी प्राथमिक उर्दू शाळा मांदिवलीचे पाटील सर होते.

banner 728x90


कार्यक्रमाच्या सुरुवातीला मोहम्मद हाफिज मुकादम याने कुराण पठण, इरम वस्ता हिने हमद, इरहम फकी हिने नात सादर केली.

शाळेतील विद्यार्थी मनाल मुकादम, इबतिसाम वलेले, शहजादी खान, मुजमील मुकादम, फातीमा अलवारे, अनस मुजावर यांनी हिंदी दिनाबददल भाषणे केली.

शाळेचे मुख्याध्यापक फैयाज सर यांनी हिंदी दिवसाचे महत्त्व सांगून विद्यार्थ्यांना भाषेवर प्रभुत्व मिळवण्याच्या सुचना दिल्या.

शाळेचे शिक्षक फहीमा मॅडम, परकार सर, जमादार सर, रेहान खान सर यांनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात पाटील सर यांनी हिंदी भाषेचे महत्व वाढवण्यास सांगीतले. कार्यक्रम सूत्रसंचालन परकार सर यांनी केले.


कार्यक्रम यशस्वीतेबददल संस्था अध्यक्ष उस्मान मालवणकर, उपाध्यक्ष डाॅ.अजीज सावंत,सचिव अ.कादीर खांचे, सहसचिव अस्लम जुवळे, शालेय समिती चेअरमन नूर मोहम्मद मुकादम, व्हाईस चेअरमन इक्बाल मुकादम, सदस्य जमालुददीन मुकादम, गुलाम हुसैन भारदे, पालक शिक्षक संघ उपाध्यक्ष मेहबूब मुकादम यांनी अभिनंदन केले.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *