दापोली तालुक्यातील पाळंदे समुद्रकिनाऱ्यावर पर्यटनासाठी आलेल्या पुण्यातील ४७ वर्षीय पर्यटकाचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ही घटना २८ डिसेंबर रोजी सायंकाळी घडली.
वैभव देवराम साबळे (वय ४७, रा. निगडी प्राधिकरण, पुणे) असे मृत पर्यटकाचे नाव आहे. ते पत्नी व मुलीसह सुट्ट्या घालवण्यासाठी दापोली येथे आले होते व पाळंदे येथील ‘सनसँड बीच रिसॉर्ट’मध्ये वास्तव्यास होते.
दिवसभर फिरून आल्यानंतर ते हॉटेलच्या खोलीत विश्रांती घेत असताना सायंकाळी साडेपाचच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा झटका आला. पत्नीने उठवण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद न मिळाल्याने त्यांना तातडीने दापोलीतील सद्गुरू रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर सायंकाळी सव्वासात वाजता त्यांना मृत घोषित केले.
या प्रकरणी २९ डिसेंबर रोजी दापोली पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















