हर्णे : एल ई डी प्रकाशझोतात मासेमारी करणाऱ्या दोन नौकांवर कारवाई

Screenshot

banner 468x60

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील हर्णे येथील समुद्रामध्ये एल ई डी प्रकाशझोतात मासेमारी करणाऱ्या दोन नौका मत्स्यव्यवसाय विभागाने पकडून त्यांच्यावर कारवाई केली आहे.

ही कारवाई 27 नोव्हेंबरच्या रात्री करण्यात आली. त्यामध्ये अलिबाग, जिल्हा रायगड येथील विनीत मनोहर जीते यांच्या मालकीची नौका एम.एम.बी. ‘भाविका’ आय एन डीएम एच -3 एम एम 3418 आणि रत्नागिरीतील अक्षय दीपक माजगावकर यांच्या मालकीची नौका ‘राजलक्ष्मी’ आय.

एन. डी. एम. एच. 4 एम एम 3795 या दोन्ही नौका हर्णे समुद्रामध्ये एलईडीच्या प्रकाशझोतात मासेमारी करीत असताना मत्स्यव्यवसाय विभागाच्या पथकाला आढळून आल्या. यापैकी रत्नागिरीतील अक्षय दीपक मजगावकर यांच्या मालकीची नौका ही अलिबाग येथील मच्छीमारांना पर्ससीन भाडेतत्वावर दिल्याचे तपासांती चौकशीत स्पष्ट झाले.

रत्नागिरी जिल्ह्याच्या सागरी हद्दीत मोठ्या प्रमाणावर एलईडी प्रकाश झोतावर मासेमारी होत असल्याचे लक्षात आल्यामुळे मत्स्यव्यवसाय कार्यालयामार्फत संयुक्त गस्त कार्यक्रम करण्यात राबविण्यात आला.

ही बेकायदेशीर मासेमारी रायगड जिल्ह्यातून असल्याची माहिती मिळाल्याने हर्णे समोरील जलदी क्षेत्रात गस्त घालण्यात आली. तेव्हा बेकायदेशीर आणि धोकादायक पद्धतीने मासेमारी करताना या दोन नौका आढळून आल्या.

या मत्स्य व्यवसाय विभागाच्या गस्ती पथकामध्ये परवाना अधिकारी साखरी नाटे पार्थ तावडे, परवाना अधिकारी रत्नागिरी चि. स. जोशी, परवाना अधिकारी गुहागर स्व. बा. चव्हाण तसेच सागरी सुरक्षा रक्षक, पर्यवेक्षक उपस्थित होते.


मत्स्य व्यवसाय विभाग रत्नागिरी मार्फत बेकायदेशीर परिस्थितीत मासेमारी आणि एलईडी प्रकाश झोताद्वारे विघातक पद्धतीने होणाऱ्या मासेमारीवर या कारवाईमुळे आळा बसण्यास मदत झाली आहे. ही कारवाई सहाय्यक मत्स्यव्यवसाय आयुक्त आनंद पालव यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *