गुहागरच्या योगिता खाडे यांनी सुवर्ण कामगिरी केली आहे. मूळची गुहागर तालुक्यातील असलेल्या योगिता खाडे या तरुणीने उझबेकिस्तान येथे झालेल्या ९ व्या आंतरराष्ट्रीय मार्शल आर्ट चॅम्पियनशिप स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावलं आहे.

गुहागर सह रत्नागिरी जिल्ह्याला हेवा वाटावा अशी कामगिरी योगिता हिने केली आहे. नुकत्याच उझबेकिस्तान येथे झालेल्या मार्शल आर्ट स्पर्धेत योगिता ही भारताकडून खेळत होती. यावेळी तिने भारताकडून सर्वोत्कृष्ट कामगिरी करत सुवर्ण पदकाला गवसणी घातली. तिने मार्शल आर्ट मध्ये सुवर्ण पदक मिळवल्याचे कुटुंबीयांना कळताच गुहागरमध्ये आनंद साजरा करण्यात आला. योगिता हिने केवळ गुहागरचेच नव्हे तर रत्नागिरी जिल्ह्याचे नाव देशाच्या नकाशावर पोहोचवले आहे. तिच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे. सद्या तिच्यावर अनेक ठिकाणाहून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













