गुहागर :परप्रांतीयांच्या व फेरीवाले यांच्या नोंदी ग्रामपंचायत मध्ये कराव्यात…

banner 468x60

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जानवळे शाखा अध्यक्ष सुशांत सदानंद कोळंबेकर यांचे सरपंच यांना निवेदन

गुहागर (प्रतिनिधी)परप्रांतीयांच्या व फेरीवाले यांच्या नोंदी जानवळे ग्रामपंचायत मध्ये कराव्यात अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे

जानवळे शाखा अध्यक्ष सुशांत सदानंद कोळंबेकर यांनी जानवळे सरपंच जान्हवी विखारे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षप्रमुख आदरणीय राजसाहेब ठाकरे यांनी केलेल्या मागणी नुसार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी परप्रांतीयांचे नोंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

तालुक्यात विविध क्षेत्रात परप्रांतिय कार्यरत आहेत. त्या सर्वांची आपल्या ग्रामपंचायत हद्दीतील त्यांचे आधारकार्ड पाहुन त्याचे फोटो काढून व इतर महत्वाच्या कागदपत्रांची चाचपणी करुन त्यांची आपल्या दप्तरी नोंद करण्यात यावी.

आणि हे परप्रांतीय मजुर कोणासाठी काम करतात ते कुठे राहतात याचीही तपासणी करुन त्याचीही नोंद ठेवावी. जेणेकरुन संभाव्य गुन्हे टळू शकतील तसेच फेरी वाल्यांना गावात फिरण्यास बंदी करण्यात यावी

असे गाव बंदीचे फलक लावण्यात यावे.येत्या १५ दिवसात या गोष्टीची अंमलबजावणी करण्यात यावी अशी अपेक्षा शाखाध्यक्ष सुशांत कोळंबेकर यांनी केली आहे.

उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर यांच्या मार्गदर्शनाखाली निवेदन देण्यात आले.यावेळी विजय शिंदे, सचिन कोळंबेकर,शुभम बैकर, साईराज बैकर, शैलेश आग्रे, हेमंत चिवेलकर,अमित कोळंबेकर तसेच महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *